विठाई अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बद्दल काही शब्द.

स्वागत आहे

आमच्याबद्दल काही शब्द

विठाई अ‍ॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनीची स्थापना 16 जानेवारी 2020 रोजी झाली. स्थापनेपासून, आम्ही 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत काम केले आहे आणि 700 पेक्षा जास्त शेतकरी आमच्याशी जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची शेती उत्पादने पुरवण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या कामामुळे कंपनीचा प्रचंड विकास झाला आहे. 2020-21 मध्ये 5 लाख, 2021-22 मध्ये 30 लाख, 2022-23 मध्ये 90 लाख, आणि 2023-24 मध्ये 1.8 कोटी रुपयांची उलाढाल झाली  आहे.

आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रभावी तणनाशके, पिकवाढ करणारी उत्पादने आणि रोगांवर मात करणाऱ्या उपायांची उत्पादने  उपलब्ध करतो. आमच्याकडे विविध हवामान आणि जमिनीत चांगले उत्पादन देणारी भाजीपाला आणि फळबियाण्यांची खास निवड आहे. शेतातील कामे अधिक सोपी करणारी आधुनिक शेती साधने, रंगीत आणि आकर्षक फुलबियाणे, तसेच प्रभावी कीटकनाशके आम्ही पुरवतो. सेंद्रिय शेती करणाऱ्या  शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक उत्पादने आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी तसेच उत्पादनक्षमतेसाठी आम्ही दर्जेदार उत्पादने उपलब्ध करतो. विठाई अ‍ॅग्रो प्रोड्यूसर्स शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यावर प्रभावी उपाय आणि मार्गदर्शन  देण्यासाठी तयार  असते. आमचे उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यास, अधिक उत्पादन मिळविण्यास, आणि सेंद्रिय शेतीसाठी मदत करतात.

नोंदणीकृत शेतकरी
0 +
एकर जमीन
0 +
सेवापूर्वत असलेली गावे
0 +
उद्योगातील अनुभव
0 +

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्या यशस्वी शेतीसाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. तर चला मग , एकत्र येऊ आणि तुमची शेती  तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या  यशापर्यंत पोहोचवू.  

Follow Us

आम्हाला शोधा

Copyright © 2024 VithaiAgro Producer Company Limited | Developed By VisionaryCreations Pvt Ltd.

error: Content is protected !!