विठाई अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचे जीवन आणि ग्रामीण भागाचा विकास करणे हे आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने आणि तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देतो. यामुळे तुमच्या शेतीचे उत्पादन वाढते आणि भरगोस उत्पन्न मिळण्यास मदत होते. आम्ही शेतकऱ्यांसाठी तणनाशके, फळे व भाजीपाल्यांचे बियाणे, पिकांसाठी लागणारी पोषकतत्त्वे, फुलांच्या बिया आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारी उत्पादने पुरवतो . तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीसाठी लागणारी उत्पादने, शेतीचा खर्च कमी करून काम सोपे बनवते. आम्ही शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला, वेळेवर सेवा, आणि योग्य मार्गदर्शनही देतो. विठाई अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी तुमच्या यशस्वी शेतीसाठी नेहमी तुमच्यासोबत आहे.
विठाई अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनीची स्थापना 16 जानेवारी 2020 रोजी MCDC–ABGC (अॅग्रो बिझनेस ग्रोथ सेल) प्रोग्राम अंतर्गत करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली, जिल्हा सोलापूर येथे स्थित असलेल्या या कंपनीने शेतकऱ्यांना परवडणाऱ्या, नाविन्यपूर्ण आणि योग्य शेती उपायांची सेवा दिली आहे.विठाईॲग्रोचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आहे. यात खरेदी-विक्री केंद्र स्थापन करणे, शेतमालाची प्रतवारी करणे, वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आणि विक्रीसाठी बाजारपेठ उभारणी करणे यांचा समावेश आहे. कंपनी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते थेट पुरवते, ज्यामुळे सभासदांना योग्य दरांमध्ये खते खरेदी करता येतात. शेती उत्पादनांच्या व्यवस्थापनासाठी कृषी मूल्य साखळी मजबूत करण्यावर कंपनीचा भर आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आणि अभ्यासदौरे आयोजित करून शेतकऱ्यांना प्रगत शेतीची ओळख करून दिली जाते. विठाईॲग्रो शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची माहिती पुरवते आणि त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करते. अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देत, शेतमालाच्या पोस्ट-हार्वेस्ट नुकसानीत कपात करण्याचे काम कंपनी करते. तसेच, शेतीशी संबंधित विविध चर्चासत्रे आयोजित करून शेतकऱ्यांना नवीन माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते. कंपनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असून, त्यांच्या शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध आहे.
१) ऍग्रो इनपुट रिटेल दुकान:
आम्ही एक ऍग्रो इनपुट रिटेल दुकान चालवतो, जेथे शेतकऱ्यांना कमी किमतीत खते, कीडनाशके आणि बियाणे उपलब्ध करून दिले जातात. आम्ही परवडणाऱ्या दरांमध्ये चांगल्या प्रकारची उत्पादने देण्यावर भर देतो आम्ही शेतकऱ्यांसाठी १०० हून अधिक माहिती पूरक कार्यक्रमाचे आयोजित केले आहे . तसेच शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी विनामूल्य माती चाचणीची सेवा दिली आहे.या उपक्रमांद्वारे द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, काकडी, कोबी आणि हंगामी भाज्यांना मदत मिळाली आहे . सर्व उपक्रम ऍग्रो रिटेल दुकानाद्वारे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आयोजित केले जातात.
२) ताज्या फळे आणि भाज्यांचा पुरवठा:
आम्ही पुण्यातील कॉर्पोरेट ग्राहकांना ताज्या फळांचा आणि भाज्यांचा पुरवठा करतो. आम्ही B2B, B2C, आणि B2B2C हे मॉडेल वापरतो. आमची ट्रॅसेबिलिटी तंत्रज्ञान गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करते.आमच्या पिकांमध्ये कांदा, मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आणि इतर भाज्यांचा समावेश आहे.आमच्या विश्वासू ग्राहकांमध्ये अग्रीटा सोल्यूशन्स प्रा. लि., अॅग्रीवाला प्रा. लि., आणि स्थानिक बाजारातील विक्रेते यांचा समावेश आहे.
३) कृषी वित्तपुरवठा:
SCIL कॅपिटल इंडिया प्रा. लि. (जय किसान फायनान्स) यांच्या सहकार्याने आम्ही लहान शेतकऱ्यांसाठी मायक्रोफायनान्स उपाय उपलब्ध करून देतो. आम्ही आतापर्यंत १२ हून अधिक शेतकऱ्यांना आवश्यक इनपुट खरेदीसाठी सहाय्य केले आहे . आम्ही आजपर्यंत ₹२,२०,२६५ वित्तपुरवठा केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या शेतीच्याविषयी संसाधने उपलब्ध झाली आहेत.
४) वर्मी कंपोस्ट सेंद्रिय खत उत्पादन:
आम्ही शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देतो. आमच्या वर्मी कंपोस्ट उत्पादनाने जमिनीची सुपीकता वाढवली असून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी केले आहे.
५) ऍग्रो आउटपुट :
आमच्या शेतकऱ्यांसोबतच्या सहकार्याने आम्ही उच्च दर्जाचे तृणधान्ये, गहू, ज्वारी, मका आणि ताज्या भाज्या उत्पादन करतो. ही उत्पादने ग्राहक आणि बाजारपेठेत पुरवली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मूल्य मिळते आणि ग्राहकांना ताजा आणि चांगला माल मिळतो .
६) भविष्यातील योजना:
आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आहे.
i)पशुखाद्य उत्पादन: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाचे पशुखाद्य तयार करणे.
ii)अन्न प्रक्रिया: पिकांच्या नमुन्यानुसार अन्न प्रक्रिया केंद्र उभारणे, जेणेकरून काढणीनंतरचे नुकसान कमी होईल.
iii)शेती यंत्रीकरण: आधुनिक शेती उपकरणांचा वापर वाढवून उत्पादनक्षमता सुधारणे.
विठाई अॅग्रो प्रोड्यूसर्स शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित आहे .
आम्ही शेतकऱ्यांना प्रभावी कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके पुरवतो. त्यामुळे तुमच्या पिकांचे रोगराई , कीड आणि तणांपासून रक्षण होत. ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होते.
आमचे खत पिकांच्या वाढीला चालना देतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते.
आमची बियाणे उच्च दर्जाची निवडलेली असतात, ज्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढते.
आमचे सेंद्रिय उत्पादने शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते.
आम्ही शेतकऱ्यांना पशुसंवर्धक उत्पादने पुरवतो, जी प्राण्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आणि ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते.
आम्ही उच्च दर्जाची उत्पादने पुरवतो, जी तुमच्या शेतीसाठी परिणामकारक ठरतात.
आमचे अनुभवी तज्ज्ञ तुमच्या शेतीच्या गरजांसाठी योग्य सल्ला आणि मदत देतात.
तुमचे समाधान हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येला प्राधान्याने सोडवतो.
आम्ही सतत कृषी तंत्रज्ञानावर संशोधन करतो, ज्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि उत्पादक बनते.
तुमच्या यशस्वी शेतीसाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. तर चला मग , एकत्र येऊ आणि तुमची शेती तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या यशापर्यंत पोहोचवू.
उत्तम उत्पादने: आम्ही उच्च दर्जाची, प्रभावी आणि विश्वासार्ह कृषी उत्पादने पुरवतो.
गुणवत्ता नियंत्रण: उत्पादनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबवतो.
ग्राहककेंद्रित सेवा: आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा नेहमी प्राधान्याने पूर्ण करतो.
संशोधन व विकास: अत्याधुनिक शेतीसाठी संशोधन आणि विकासावर भर देतो.
आधुनिक तंत्रज्ञान: शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरतो.
शाश्वत पद्धती: पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देतो.
तज्ज्ञांचे सहकार्य: शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मदत देतो.
वेळेवर वितरण: आमची उत्पादने वेळेवर पोहोचवतो.
योग्य दर: उच्च दर्जा कायम ठेवत स्पर्धात्मक दर देतो.
विश्वास निर्माण: आमच्या ग्राहकांशी दृढ आणि दीर्घकालीन नाते निर्माण करतो.
पर्यावरणपूरक उत्पादने: पर्यावरणास सुरक्षित उपायांचा प्रचार करतो.
माती आरोग्य उपक्रम: माती व्यवस्थापनासाठी टिकाऊ पद्धती प्रोत्साहित करतो.
जैवविविधता संवर्धन: आरोग्यदायी परिसंस्था आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देतो.
पाणी कार्यक्षमता: पाणी बचत करणाऱ्या शेती तंत्रांचा प्रचार करतो.
विठाई अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी गुणवत्ता, नावीन्य, ग्राहक सेवा आणि शाश्वतता याच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
तुमच्या यशस्वी शेतीसाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. तर चला मग , एकत्र येऊ आणि तुमची शेती तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या यशापर्यंत पोहोचवू.
Copyright © 2024 VithaiAgro Producer Company Limited | Developed By VisionaryCreations Pvt Ltd.