शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ?

* शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.
* शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते.
* शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये, विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकरी, त्यांचे समूह यांना एकत्रित करून एक प्रभावी संघटन तयार केले जाते. या माध्यमातून अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवली जाऊ शकतात.

शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य-

• शेतकऱ्यांचे प्रभावी संघटन तयार करणे.
• विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे.
• शेतमालाची प्रतवारी करून मालाची श्रेणी ठरवणे.
* कंपनी मार्फत खरेदी-विक्री केंद्र उभारणे.
* उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाय-प्रोडक्ट बनविणे.
* नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे.
* शेतकरी आणि सभासदांच्या फायद्या साठी तंत्रज्ञान, मार्केट उभारणी साठी
गुंतवणूक करणे.
* सदस्यांनी उत्पादित केलेल्या मालाची ब्रँडिंग करणे
* शेतमालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे.
* नवीन बाजारपेठ निर्माण करणे.

error: Content is protected !!